Posts

सिंहगड माझा सखा

Image
आज २०१९ वर्षाखेर.. या वर्षातील  कदाचीत आजची विसावी वेळ सिंहगड ट्रेकिंग ची. आज सकाळी बऱ्यापैकी धुकं होते. गाडी चालवताना पण त्रास होत होता..विशेषतः खडकवासला पट्टयात धुक्याची चादर दाट होती. तशी रस्त्यावर विशेष गर्दी पण नव्हती.. पायथ्याला उतरलो .. .. पहाट निघण्याची तयारी करत होती.. थांब सखे, म्हणत दिवसाचे दूत पूर्वेला अजून ललकारी द्यावयाचे होते.. नी एकदम मला आठवण झाली माझ्या मोबाईल मधील नाईट मोडमध्ये फोटो  काढण्याच्या बटणाची. सुंदर फोटो काढून झाले.. स्वानंद म्हणजे माझा मुलगा नी मी असे दोघेच होतो आज.. स्वानंद म्हणजे चढाई चे टार्गेट.. कमीत कमी वेळात गड सर करायचा. एक एक मिनिटाचा हिशोब ठेवतो तो. तो आधी पोहचणार याची खात्री असल्याने त्याला जवळ थोडे पैसे दिले नी वर जावून सरबत पिण्यास सांगितले. आज का कोण जाणे आकाश नुसते वेगवेगळे रंग उधळत होते.. नुसता जल्लोष... कदाचित सरत्या वर्षाला प्रेमाने निरोप नी नव्या आशेच्या उद्याच्या सूर्याला आदरपूर्वक आवाहान.  क्षणाक्षणाला रूप पालटत होते आकाश स्वतःचं. आजचा हा कॅलिडोस्कोप फारच अप्रतिम होता.. थोड रेंगाळत, कधी थोड वेगाने , अशी वर कुच ...